मेहकरमध्ये 24 तासांत एकही कोरोनाबाधित नाही!; जिल्ह्यात नव्‍या 641 रुग्‍णांची भर! जळगाव जामोदमध्ये तीव्रता वाढतेय

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 641 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात 11 तालुक्यांचा सहभाग आहे. जळगाव जामोद तालुक्यामधील कोविडकुमारची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. तसेच संग्रामपूरमध्येही आता पेशंट सापडायला लागले आहेत. दुसरीकडे मेहकरमध्ये मात्र आज निरंक आहे. मागील तीन दिवसांपासून रुग्ण संख्या आटोक्यात असल्याचे चित्र आहे. आजही 641 असा दिलासादायक आकडा आहे. …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः जिल्ह्यात गेल्‍या 24 तासांत 641 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍ण आढळले. यात 11 तालुक्यांचा सहभाग आहे. जळगाव जामोद तालुक्यामधील कोविडकुमारची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. तसेच संग्रामपूरमध्येही आता पेशंट सापडायला लागले आहेत. दुसरीकडे मेहकरमध्ये मात्र आज निरंक आहे.

मागील तीन दिवसांपासून रुग्ण संख्या आटोक्यात असल्याचे चित्र आहे. आजही 641 असा दिलासादायक आकडा आहे. मेहकरात एकही रुग्ण नसणे व शेगावमध्ये अल्प (5) संख्या हे आजच्या अहवालाचे वैशिष्ट्य ठरावे, अलीकडे जळगाव जामोद तालुक्यात पॉझिटिव्हची संख्या वाढती आहे, मागील 3 दिवसांत 81, 58, 73 असे आकडे आहेत. आज हाच आकडा 77 इतका आहे. यामुळे तेथील आरोग्य यंत्रणा व  प्रशासनाने अधिक सावध राहण्याची गरज आहे.

संग्रामपूरमधील आकडे आता वाढताहेत. आज तिथे 34 बाधित निघाले. यासह जिल्ह्याच्या स्कोअरमध्ये बुलडाणा 90, खामगाव 58, देऊळगाव राजा 59, चिखली 75, मलकापूर 45, नांदुरा 70, लोणार 53, मोताळा 53, सिंदखेडराजा 22 या तालुक्यांनी आपल्या परीने वाटा उचलला आहे. केवळ रुग्णसंख्या कमी आहे म्हणून नव्हे तर गत्‌ 24 तासांतील मृत्यूसंख्याही 2 एवढीच आहे. यामुळे गजानन कृपेने आजचा गुरुवार किंचित दिलासा देणारा ठरलाय.