मेहकरात भूमिपुत्राचा डंका!; बहुतांश ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा; स्वाभिमानीनेही लावला जोर!!

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भूमिपूत्र खासदार प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला मानला जाणारा मेहकर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीतही जवळपास त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. बहुतांश ग्रामपंचायतींवर भगवा फडकला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही जोर लावत पक्षीय राजकारणात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. आज सकाळी 9 पासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. एकूण 14 टेबलवर …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भूमिपूत्र खासदार प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला मानला जाणारा मेहकर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीतही जवळपास त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. बहुतांश ग्रामपंचायतींवर भगवा फडकला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही जोर लावत पक्षीय राजकारणात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.

आज सकाळी 9 पासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. एकूण 14 टेबलवर 22 फेर्‍यांत निकाल जाहीर करण्यात आला. सर्वात पहिला निकाल कनका गावाचा जाहीर झाला. या ठिकाणी 6 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. 3 निवडणुकीत विजयी झाले. या एकूण 9 पैकी 9 पैकी 9 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मादणी येथील 9 पैकी 7 सदस्य शिवसेना पुरस्कृत पॅनलचे निवडून आले आहेत. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या डोणगाव येथे शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 7, काँग्रेस- राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे 8 व 2 अपक्ष उमेदवार निवडून आले. शेलगाव देशमुख येथील महाविकास आघाडीचे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते तर आज 5 उमेदवार निवडून आले. लोणीगवळी येथे दोन माजी सभापतींमध्ये काट्याची लढत झाली आणि लढाई जणू बरोबरीत सुटली. केशवराव जागृत यांच्या पॅनलला 5 तर सागर पाटील यांच्या पॅनलला 5 जागा मिळाल्या. 1 अपक्ष उमेदवार निवडून आला. गोहोगाव येथे भाजप पुरस्कृत पॅनलचे 8 तर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 1, देऊळगाव माळी येथे महाविकास आघाडी पॅनलचे 10 तर गावकरी पॅनलचे 3, अंजनी येथे काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे 9 तर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 3, विश्‍वी येथे शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 8 तर भाजप पुरस्कृत पॅनलचे 5, देऊळगाव साकर्शा येथे शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 8 तर भाजप पुरस्कृत पॅनलचे 5, पांगरखेड येथे शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 9, नागापूर येथे शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 4 तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत पॅनलचे 3 अशा प्रकारे मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. बहुसंख्य ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेससह राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सुद्धा अस्तित्व सिद्ध केले आहे. मेहकर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस प्रशासनाने अगदी चोख बंदोबस्त ठेवला होता.