मेहकर ः निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आरेगाव पकडली अवैध दारू

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ढाब्यांवर, हॉटेलात सध्या उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांच्या पार्ट्या रंगल्या आहेत. उमेदवारांची ठराविक माणसे प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवून आहेत. अशात ग्रामीण भागात दारू वाटपाचेही नियोजन केल्याचे दिसून येत असून, मेहकर तालुक्यातील आरेगाव येथे मात्र डोणगाव पोलिसांच्या सतर्कमुळे दारू वाटपाचा कार्यक्रम फसला. 14 जानेवारीला दुपारी पावणेचारच्या सुमारास देशी …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ढाब्यांवर, हॉटेलात सध्या उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांच्या पार्ट्या रंगल्या आहेत. उमेदवारांची ठराविक माणसे प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवून आहेत. अशात ग्रामीण भागात दारू वाटपाचेही नियोजन केल्याचे दिसून येत असून, मेहकर तालुक्यातील आरेगाव येथे मात्र डोणगाव पोलिसांच्या सतर्कमुळे दारू वाटपाचा कार्यक्रम फसला. 14 जानेवारीला दुपारी पावणेचारच्या सुमारास देशी दारूच्या 202 बाटल्या (किंमत 10 हजार 504 रुपये) जप्त करण्यात आल्या आहेत.

गोपनीय माहितीनुसार ठाणेदार दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवाजी राठोड, पोहेकाँ नरेंद्र अंभोरे, पो.काँ. पवन गाभणे, अखतर, विकास राऊत, विनोद काकड, सावंत यांच्या पथकाने पंचांसमक्ष नंदकिशोर हिंमतराव टाले याच्यावर झडप घातली. त्याच्या ताब्यातून संजीवनी कंपनीच्या सीलबंद 180 मि.ली. च्या 202 नग देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्याला ताब्यात घेऊन उपनिरीक्षक शिवाजी राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.