मेहकर तहसील कार्यालयात रात्री विपरितच घडलं!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तहसील कार्यालयात काल, २० जुलैच्या रात्री अज्ञात व्यक्तीने धिंगाणा घातला. तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या खोल्यांचे कुलूप तोडून तेथील साहित्याची नासधूस केली. तहसील कार्यालयातील कँटिनमधील गॅस सिलिंडरही लांबवले. आज, २१ जुलैला सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर नायब तहसीलदार श्रीमती परळीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तहसील कार्यालयात काल, २० जुलैच्या रात्री अज्ञात व्यक्तीने धिंगाणा घातला. तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या खोल्यांचे कुलूप तोडून तेथील साहित्याची नासधूस केली. तहसील कार्यालयातील कँटिनमधील गॅस सिलिंडरही लांबवले. आज, २१ जुलैला सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर नायब तहसीलदार श्रीमती परळीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदारांच्या कॅबिनसह पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना कक्ष व वेगवेगळ्या खोल्यांचे कुलूप तोडले. साहित्याची नासधूस केली. हे करण्यामागे त्याचा इरादा काय होता हे कळू शकले नाही. तहसील कार्यालय परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला असला तरी अज्ञात व्यक्ती कोण आणि त्याने हे कशासाठी केले हे स्पष्ट होऊ शकले नाही.