मेहकर तालुक्यात दहा बदक आढळले मृतावस्थेत!

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः काल चिखली तालुक्यात 200 कोंबड्यांचा एकाएकी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मेहकर तालुक्यातील मादणी शिवारात धरणाजवळ दहा बदक मृतावस्थेत आढळल्याने नागरिक धास्तावल्याचे चित्र आहे.कोरोनाचे भूत मानगुटीवर असतानाच बर्ड फ्लू हे संकट आल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यातच मादणी शिवारात धरणाजवळ सकाळी नागरिक शेतामध्ये गेले असताना त्यांना 10 बदक जातीचे …
 

मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः काल चिखली तालुक्यात 200 कोंबड्यांचा एकाएकी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच  मेहकर तालुक्यातील मादणी शिवारात धरणाजवळ दहा बदक मृतावस्थेत आढळल्याने नागरिक धास्तावल्याचे चित्र आहे.
कोरोनाचे भूत मानगुटीवर असतानाच बर्ड फ्लू हे संकट आल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यातच मादणी शिवारात धरणाजवळ सकाळी नागरिक शेतामध्ये गेले असताना त्यांना 10 बदक जातीचे पक्षी मृतावस्थेत दिसून आले. ही माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मेहकर तालुकाध्यक्ष नितीन अग्रवाल यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांच्यापाठोपाठ पशुवैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्‍वर देशमुख यांनी धावून येत काही पक्ष्यांचे नमुने घेत तपासणीसाठी लॅबला पाठविले. तपासणी अहवाल आल्यानंतरच कळेल की पक्षांचा कशामुळे मृत्यू झाला. मात्र राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.