मेहकर तालुक्यात मोठी कारवाई ः धान्याचे गोडाऊन फोडणाऱ्या तिघांकडून साडेसोळा लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धान्याचे गोडाऊन फोडून ४२ क्विंटल तूर लांबविणाऱ्या तीन दरोडेखोरांना काल, ४ जुलैला सायंकाळी मेहकर तालुक्यातील विश्वी येथे अटक करण्यात आली. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ही धडाकेबाज कारवाई केली. एप्रिल महिन्यात विश्वी येथील धान्य गोडाऊनमध्ये चोरी झाली होती. चोरट्यांनी २ लाख ६३ हजार रुपयांची तूर लंपास केली होती. डोणगाव पोलिसांनी याप्रकरणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः धान्याचे गोडाऊन फोडून ४२ क्विंटल तूर लांबविणाऱ्या तीन दरोडेखोरांना काल, ४ जुलैला सायंकाळी मेहकर तालुक्यातील विश्वी येथे अटक करण्यात आली. बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने ही धडाकेबाज कारवाई केली.

एप्रिल महिन्यात विश्वी येथील धान्य गोडाऊनमध्ये चोरी झाली होती. चोरट्यांनी २ लाख ६३ हजार रुपयांची तूर लंपास केली होती. डोणगाव पोलिसांनी याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणाचा तपास बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेकडे (एलसीबी) सोपविण्यात आला होता. “एलसीबी’ने तांत्रिक तपास करून काल विश्वी येथील तिघांना बेड्या ठोकल्या. योगेश गणेश राठोड, रामा जाधव, विलास गुलाब राठोड (तिघेही रा. विश्वी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १६ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एक टाटा ४०७ (किंमत ८ लाख रुपये), एक टाटा छोटा हत्ती (किंमत ४ लाख रुपये), ४२.५ क्विंटल तूर, २ मोबाइल फोन, गुन्ह्यात वापरलेलेली दुचाकी आणि रोख ८६ हजार रुपये असा एकूण १६ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनििरक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ प्रकाश राठोड, सय्यद हारून, लक्ष्मण कटक, गजानन गोरले, विजय सोनोने, रवी भिसे, राहुल बोर्डे यांनी पार पाडली.