मेहकर पंचायत समिती सभापतीचा सोमवारी फैसला! लोणार, सिंदखेड राजा उपसभापतीची निवडही याच मुहूर्तावर, 3 तालुक्यांत राजकीय हालचालींना वेग

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रिक्त असलेल्या मेहकर पंचायत समिती सभापती आणि लोणार, सिंदखेडराजा उपसभापती पदाची निवडणूक एकाच मुहूर्तावर होणार असल्याने तिन्ही तालुक्यांतील राजकारण तापले आहे. इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी मेहकरमध्ये सभापती निंबाजी पांडव यांनी 19 एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. तसेच लोणारचे …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  रिक्त असलेल्या मेहकर पंचायत समिती सभापती आणि लोणार, सिंदखेडराजा उपसभापती पदाची  निवडणूक एकाच मुहूर्तावर होणार असल्याने तिन्ही तालुक्यांतील राजकारण तापले आहे. इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

यापूर्वी मेहकरमध्ये सभापती निंबाजी पांडव यांनी 19 एप्रिल रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. तसेच लोणारचे उपसभापती हेमराज लाहोटी यांनी 5 एप्रिल व सिंदखेड राजाच्या उपसभापती लता खरात यांनी 16 एप्रिल रोजी सभापतींकडे राजीनामे सादर केले, हे राजीनामे मंजूर करण्यात आल्याने ही पदे रिक्त झाली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 10 मे रोजी तिन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून संबंधित तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, ही तिन्ही पदे राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुक्यातील आहे. यामुळे राजकीय हालचाली वाढणे व राजकारण तापणे क्रमप्राप्त ठरते. या पदांसाठी इच्छुक व आजवर संधी न मिळालेल्या सदस्यांनी कंबर कसली आहे. आपल्या नेत्यांकडे लॉबिंग करणे, सदस्यांच्या गाठीभेटी घेणे यावर त्यांचा जोर आहे, ही शेवटची संधी असल्याने काहींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बाब केली आहे.