मेहकर शहरात अस्वलाचा धुमाकूळ!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरट्यांच्या भीतीने कॉलनीत गस्त घालणाऱ्या नागरिकांना अस्वल दिसून आल्याने मेहकर शहरात खळबळ उडाली आहे. 4 एप्रिलला रात्री नागरिकांना अस्वल दिसून आला होता. त्यानंतर काल रात्रीसुद्धा नागरिकांना अस्वल दिसून आल्याचे नागरिकांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. मेहकर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी स्वतःहून गस्त घालणे सुरु केले आहे. शहरातील पटवारी कॉलनीत काही नागरिक …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः चोरट्यांच्या भीतीने कॉलनीत गस्त घालणाऱ्या नागरिकांना अस्वल दिसून आल्याने मेहकर शहरात खळबळ उडाली आहे. 4 एप्रिलला रात्री नागरिकांना अस्वल दिसून आला होता. त्यानंतर काल रात्रीसुद्धा नागरिकांना अस्वल दिसून आल्याचे नागरिकांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले.

मेहकर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनी स्वतःहून गस्त घालणे सुरु केले आहे. शहरातील पटवारी कॉलनीत काही नागरिक गस्त घालत असताना त्यांना दोन अस्वले दिसून आली. त्यांनी स्वतः अस्वलाला हुलकावणी देऊन बचाव केला. मात्र अस्वलाच्या मुक्त संचारामुळे आता  मेहकर शहरात रात्री संचारबंदी दिसून येत आहे.