मॉर्निंग वॉक बेतला जिवावर… पोलीस कर्मचारी महिलेला ट्रकने चिरडले; बुलडाणा शहरातील घटना, “एलसीबी’त होत्‍या कार्यरत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना आज, ६ सप्टेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. त्या चिखली रोडवर मॉर्निंग वॉक करत होत्या. कृष्णा दूध डेअरीसमोर हा अपघात घडला. गीता बामंदे (४०, रा. पोलीस लाईन, बुलडाणा) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. सफरचंद घेऊन मलकापूरकडून …
 
मॉर्निंग वॉक बेतला जिवावर… पोलीस कर्मचारी महिलेला ट्रकने चिरडले; बुलडाणा शहरातील घटना, “एलसीबी’त होत्‍या कार्यरत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी महिलेला ट्रकने चिरडल्‍याची घटना आज, ६ सप्‍टेंबरला सकाळी साडेसहाच्‍या सुमारास घडली. त्‍या चिखली रोडवर मॉर्निंग वॉक करत होत्‍या. कृष्णा दूध डेअरीसमोर हा अपघात घडला.

मॉर्निंग वॉक बेतला जिवावर… पोलीस कर्मचारी महिलेला ट्रकने चिरडले; बुलडाणा शहरातील घटना, “एलसीबी’त होत्‍या कार्यरत

गीता बामंदे (४०, रा. पोलीस लाईन, बुलडाणा) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. सफरचंद घेऊन मलकापूरकडून चिखलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्या जागीच ठार झाल्या. ट्रकचालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी आरडाओरड केल्याने गर्दी जमली. हाकेच्या अंतरावर असलेल्या शहर पोलिसांनी ट्रकचालक व ट्रकला ताब्यात घेतले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.