मोटारसायकलला धडक मारून कारची धूम!; पाठलाग करून कार पकडली तर चालक नशेत तर्रर्रऽ!; एक गंभीर जखमी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः मोटारसायकलला धडक मारून कार भरधाव निघून गेली. यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती वेळीच जखमीच्या नातेवाइकांना मिळाल्याने त्यांनी कारचा पाठलाग करत बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील स्टेट बँकेजवळ कारला अडवले. यावेळी कारचालक नशेत तर्रर्र आढळला. त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना काल, २३ जुलैच्या रात्री आठच्या सुमारास घडली. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः मोटारसायकलला धडक मारून कार भरधाव निघून गेली. यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती वेळीच जखमीच्‍या नातेवाइकांना मिळाल्याने त्‍यांनी कारचा पाठलाग करत बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील स्‍टेट बँकेजवळ कारला अडवले. यावेळी कारचालक नशेत तर्रर्र आढळला. त्‍याला शहर पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले आहे. ही घटना काल, २३ जुलैच्‍या रात्री आठच्‍या सुमारास घडली.

गणेश धनसिंग चंदेल (३०, रा. सावळा, ता. बुलडाणा) असे जखमीचे नाव आहे. त्‍याचा चुलत भाऊ संतोष मोतीसिंग चंदेल (३५, रा. सावळा) यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी सुधीर तुकाराम नाफडे (४९, रा. आैरंगाबाद) या कारचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. गणेश राजश्री शाहू बँकेत काम करतो. तो सावळा येथे मोटारासायकलने (MH28-Y6242) घरी जात असताना त्‍याला भरधाव क्रेटा कारने (MH20-FG-3500) उडवले. ही बाब संतोष चंदेल यांना लहान भाऊ बबलूने कळवली. त्‍यावेळी संतोष चंदेल सुंदरखेड फाट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत होते. फोननंतर काहीच वेळात अपघातग्रस्‍त कार खामगावकडून बुलडाण्याकडे भरधाव येताना दिसली. या कारचे समोरचे चाक फुटलेले होते. संतोष चंदेल यांनी मित्रांसोबत कारचा पाठलाग करून ती चिखली रोडवर पकडली. यावेळी कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. गाडीची ड्रायव्हर साइडची संपूर्ण बाजू चेपलेली होती. त्‍यामुळे शहर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तिथे तातडीने धाव घेऊन चालकाची विचारणा केली व त्‍याला पोलीस ठाण्यात नेले. गणेशवर डॉ. भवटे यांच्‍या दवाखान्यात उपचार सुरू असून, तो गंभीर जखमी आहे.