मोटारसायकल डिलरशीप देतो म्‍हणून चिखलीच्‍या व्यापाऱ्याला सव्वा लाखाचा गंडा!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. चिखलीतील आणखी एका व्यापारी “गुगल’मुळे फसले आहेत. सव्वा लाखानी त्यांची फसवणूक झाली असून, या प्रकरणी सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केटीएम कंपनीच्या मोटारसायकलची डिलरशीप घेण्यासाठी चिखलीचे व्यापारी सुबोध वारे यांनी गुगलवर कंपनी शोधली आणि फसले! झाले असे …
 
मोटारसायकल डिलरशीप देतो म्‍हणून चिखलीच्‍या व्यापाऱ्याला सव्वा लाखाचा गंडा!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ऑनलाइन फसवणुकीच्‍या घटना वाढल्‍या आहेत. चिखलीतील आणखी एका व्यापारी “गुगल’मुळे फसले आहेत. सव्वा लाखानी त्‍यांची फसवणूक झाली असून, या प्रकरणी सायबर विभागाने गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केटीएम कंपनीच्या मोटारसायकलची डिलरशीप घेण्यासाठी चिखलीचे व्यापारी सुबोध वारे यांनी गुगलवर कंपनी शोधली आणि फसले!

झाले असे की, सुबोध दिनकरराव वारे (रा. चिखली) यांना केटीएम कंपनीची मोटारसायकल डिलरशीप घ्यायची होती. त्‍यांनी २१ जुलैला गुगलवर सर्च केले. त्‍यानंतर त्‍यांना कंपनीचे प्रतिनिधी अमित कोठारी याने 9007916255 या नंबरवरून संपर्क केला. त्‍याने वारे यांना ४ वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न, अकाउंट बॅलेन्स शीट, आधारकार्ड, पॅन कार्ड व फोटो अशी कागदपत्रे त्यांच्या कंपनीच्या इ-मेल आयडीवर पाठविण्यास सांगीतले. त्‍यांनी कागदपत्रे पाठविल्यानंतर कोठारी याने उद्या तुमचा डिलरशिप कोड आेपन होऊन नियुक्ती होईल व तुमचा LoI (letter of Intent) येईल.त्यात रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला सव्वा लाख रुपये ऑनलाइन भरावे लागतील. त्‍यानुसार वारे यांनी सव्वा लाख रुपये RTGS केले. यानंतर २४ जुलैला कंपनीचा दुसरे प्रतिनिधी म्‍हणून राजेश नेगी याने संपर्क केला व सांगितले, की तुम्‍हाला एका मोटारसायकलची बुकिंग करावी लागेल आणि त्‍याने त्‍यांना KTM माॅडेलची यादी पाठवली. सोबतच संपूर्ण रकमेच्या ४० टक्‍के रक्कमही आधी भरावी लागेल, असे सांगितले.

मात्र वारे यांनी घरात चर्चा केला असता शोरूम किंवा जागा न पाहता गाड्यांची बुकिंग करा व पैसे पाठवा, असे कसे सांगू शकतात, यावर शंका व्‍यक्‍त करण्यात आली. त्‍यामुळे वारे यांनी मुलासह नाशिक येथे भेटून पैसे देऊ, असे नेगीला सांगून नाशिक गाठले असता तिथे त्‍या कंपनीचे ऑफिसच नव्‍हते. त्‍या जागेवर वासन ग्रुपच्‍या KTM कंपनीची मोटरसायकल डिलरशीप होती. अधिक खोलवर चौकशी केली असता तेथील शोरुममधील कर्मचाऱ्यांनी वासन ग्रुपच्‍या मॅनेजरशी बोलणे करून दिले व त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बजाजच्या शोरुमवर भेटण्यासाठी बोलावले. तेथे गेल्यावर त्यांनी कागदपत्रे तपासली असता संपूर्ण बनावट गिरी असल्याचे त्‍यांनी सांगितले. फसवले गेल्याची जाणीव होता वारे यांनी सायबर क्राईम विभाग गाठून तक्रार दिली. तपास सुरू आहे.