मोठी बातमी… लॉकडाऊनची चिन्‍हे!; कोरोना नाबाद 301!; जिल्ह्यात खळबळ

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तब्बल 3 दिवस दुहेरी शतकावर नाबाद राहणाऱ्या कोरोनाने आज, 21 फेब्रुवारीला तब्बल 301 चा आकडा गाठून जिल्ह्यात व आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडवून दिलीय! रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता ही दुसरी लाट असल्याची भीती नागरिकांत निर्माण झाली आहे. तसेच आता लवकरच किमान रात्रीच्या कडक लॉकडाउनची …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तब्बल 3 दिवस दुहेरी शतकावर नाबाद राहणाऱ्या कोरोनाने आज, 21 फेब्रुवारीला तब्बल 301 चा आकडा गाठून जिल्ह्यात व आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडवून दिलीय! रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता ही दुसरी लाट असल्याची भीती नागरिकांत निर्माण झाली आहे. तसेच आता लवकरच किमान रात्रीच्या कडक लॉकडाउनची शक्यता असल्याचे मानले जात आहे.
मागील 3 दिवसांपासून पॉझिटिव्हची संख्या 215 च्या पार येत आहे. आज हे व सर्व विक्रम( !) मोडणाऱ्या कोरोनाने 300 चा धोकादायक पल्ला गाठलाय! यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचे गंभीर चित्र आहे. चाचण्यांचा वेग वाढविण्याचे आदेश व गरजही असल्याने यंत्रणांनी त्याची अंमलबजावणी केली. एकूण 3159 स्वब नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी सुमारे 50 टक्के नमुन्यांचे म्हणजे 1572 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील तब्बल 301 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 1235 नमुने निगेटिव्ह आले असले तरी हा दिलासा कागदोपत्रीच ठरणारा आहे. आजअखेर मृत्यूचा आकडा 187 पर्यंत पोहोचला आहे.

…आणि भीती
दरम्यान शहरासह ग्रामीण भागात वेगाने फैलावणारा कोरोना व सव्वादोनशेच्या वर येणारा आकडा धोक्याची घंटा मानली जात आहे, यामुळे किमान रात्रीची संचारबंदी एकदम कडक करण्यावर वा व्यापारी आस्थापनाची वेळ कमी करण्यावर प्रशासन गंभीर विचार करू शकते.

  • आज आढळलेले पॉझिटिव्‍ह रुग्‍ण
  • बुलडाणा ः 72
  • चिखली ः 88
  • देऊळगाव राजा ः 38
  • खामगाव ः 29
  • शेगाव ः 8
  • मेहकर ः 16
  • नांदुरा ः 3
  • लोणार ः 22
  • मोताळा ः 8
  • सिंदखेड राजा ः 9
  • सिद्धीविनायक कोविड केअर सेंटर ः 7