मोठी “रेड’ समजून पोलिसांनी सिनेस्‍टाइल छापा मारला, पण सारेच निघाले कंगाल “बादशाह’!; वैरागडमध्ये ११ जण पकडले

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एक्का दे, बादशाह दे… असे म्हणून वैरागडमध्ये (ता. चिखली) जुगार खेळणारे कंगालच म्हणावे लागतील. कारण ११ जण अमडापूर पोलिसांनी पकडले, पण त्यातील एकाकडेही हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम नव्हती. अगदी १४० रुपये घेऊन एक जण खेळायला बसलेला आढळला. ही कारवाई ६ ऑगस्टला मध्यरात्री करण्यात आली. दिनेश शिवाजी वानखेडे (२५) याच्या अंगझडतीत …
 
मोठी “रेड’ समजून पोलिसांनी सिनेस्‍टाइल छापा मारला, पण सारेच निघाले कंगाल “बादशाह’!; वैरागडमध्ये ११ जण पकडले

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एक्का दे, बादशाह दे… असे म्‍हणून वैरागडमध्ये (ता. चिखली) जुगार खेळणारे कंगालच म्‍हणावे लागतील. कारण ११ जण अमडापूर पोलिसांनी पकडले, पण त्‍यातील एकाकडेही हजार रुपयांपेक्षा जास्‍त रक्‍कम नव्‍हती. अगदी १४० रुपये घेऊन एक जण खेळायला बसलेला आढळला. ही कारवाई ६ ऑगस्‍टला मध्यरात्री करण्यात आली.

दिनेश शिवाजी वानखेडे (२५) याच्‍या अंगझडतीत नगदी ८२०, अंकुश नवनाथ बांगर (३१) याच्‍याकडे ४३० रुपये, गजानन पुंडलिक टापरे (३८) याच्‍याकडे ५९० रुपये, प्रदीप जगन्नाथ गव्हाणे (४०)याच्‍याकडे ६८० रुपये, याेगेश देवानंद गुंड (२४) याच्‍याकडे अंगझडतीत ५६० रुपये, विनोद नारायण वानखेडे (३०) याच्‍याकडे ७४० रुपये, गोपाल निवृत्ती बनचर (२५) याच्‍याकडे ८६० रुपये, अनिल सुभाष बिबे (२८) याच्‍याकडे ५१०, आकाश अशोक मोरे (२२) याच्‍याकडे ७९० रुपये, सागर एकनाथ जगताप (२२) याच्‍याकडे ६१० , महादेव रामा रसाळ (२८) याच्‍या अंगझडतीत १४० रुपये जप्‍त करण्यात आले. पो.काँ. सोमनाथ नप्ते यांच्‍या तक्रारीवरून या सर्वांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पो.ना. सुनिल राठोड, पो.काँ. गजानन राजपूत, पोकाँ रामेश्वर बस्सी यांनी गोपनीय माहितीवरून वैरागड गाठले. ग्रामपंचायतीसमोर दोन पंचांना बोलावून कारवाईची माहिती देत त्‍यांना सोबत घेऊन पायीच लपत छपत हे पोलीस कर्मचारी इंदिरानगरमध्ये पोहोचले. आडोशाने पाहिले असता ११ जण घोळका करून बसलेले होते व “एक्का दे बादशहा दे’ असे म्‍हणून जुगार खेळत होते. त्‍याचवेळी पोलिसांनी त्‍यांच्‍यावर झडप घातली. त्‍यामुळे एकच पळापळ सुरू झाली. पण पोलिसांनी त्‍यांना पळण्याची संधीच दिली नाही.