मोताळा ग्रामीण रुग्‍णालयात लवकरच 10 ऑक्सिजन बेड ः आमदार संजय गायकवाड यांची ग्‍वाही

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील सरकारी रुग्णालयावर ताण येत असल्याने मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच 10 ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली. आमदार गायकवाड यांनी रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयाबाहेर पाणी आणि बसण्याची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लसीकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले, की जेव्हा आपला नंबर येईल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील सरकारी रुग्‍णालयावर ताण येत असल्याने मोताळा येथील ग्रामीण रुग्‍णालयात लवकरच 10 ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्‍ध करण्यात येईल, अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

आमदार गायकवाड यांनी रुग्‍णालयाची पाहणी केली. रुग्‍णालयाबाहेर पाणी आणि बसण्याची व्‍यवस्‍था केली जाईल, असेही त्‍यांनी सांगितले. लसीकरणाबद्दल बोलताना ते म्‍हणाले, की जेव्‍हा आपला नंबर येईल तेव्‍हाच नागरिकांनी यावे. जेणेकरून गैरसोय होणार नाही, असे आवाहन त्‍यांनी केले. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्‍यांनी केले. यावेळी त्‍यांच्‍यासोबत तहसीलदार श्री. सोनवणे, ठाणेदार माधवराव गरूड, नगरपंचायतीच्‍या मुख्याधिकारी श्रीमती वराडे, डॉ. अमोल पाटील आदींची उपस्‍थिती होती.