मोताळा तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल खाकरे यांची कोरोनाशी अयशस्वी झुंज!

मोताळा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माणसाचे आयुष्य म्हणजे विचित्र, सुखद दुःखद घटनांचा मेळ राहतो. जीवन- मरणाचा संघर्ष ठरतो. मोताळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्यपती अनिल प्रकाश खाकरे – पाटील ( ३ ९ ) यांचा जीवनपट आणि मृत्यूशी अल्पावधीतच लागोपाठ दोनदा केलेले दोन हात हे याचे दुर्दैवी उदाहरण ठरावे. कोरोनाशी दुसऱ्यांदा मुकाबला …
 

मोताळा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः माणसाचे आयुष्य म्हणजे विचित्र, सुखद दुःखद घटनांचा मेळ राहतो. जीवन- मरणाचा संघर्ष ठरतो. मोताळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्यपती अनिल प्रकाश खाकरे – पाटील ( ३ ९ ) यांचा जीवनपट आणि  मृत्यूशी अल्पावधीतच लागोपाठ दोनदा केलेले दोन हात हे याचे दुर्दैवी उदाहरण ठरावे. कोरोनाशी दुसऱ्यांदा मुकाबला करताना अखेर त्यांच्यावर आज, 18 मे रोजी कालरूपी कोरोनाने मात केली!

बुलडाणा येथील रुग्णालयात सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तालुक्यातील मूर्ती येथील मूळ निवासी व सध्या मोताळा येथे वास्तव्यास असलेले अनिल खाकरे – पाटील हे पंचक्रोशीतील सुपरिचित व्यक्तिमत्व  होते. यामुळे त्यांनी लोकप्रियता व लोकसंग्रह या बळावर राजकारणात अल्पावधीत यश मिळविले. ते मोताळा तालुक्यातील कोथळी बोराखेडी जि.प. सर्कलचे  सदस्य होते. आरक्षणामुळे त्यांच्या अर्धांगिनी जयश्री खाकरे – पाटील या सर्कलच्या विद्यमान जि.प.सदस्या आहेत. यावरून त्यांची लोकप्रियता नव्याने सिद्ध झाली होती. अनिल खाकरे यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी यशस्वी झुंज देत कोरोनावर यशस्वीपणे मात केली. मात्र नुकतेच त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाने गाठले. त्यामुळे चार ते पाच दिवसांपासून त्यांच्यावर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी झाली होती. एका उमद्या राजकारण्याचा अकाली अंत झाला आहे.