मोताळा, शेगावात बर्ड फ्लूची घुसखोरी!; सारोळापीर, भोलपुरातील नमुने आले पॉझिटिव्ह

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील भानखेड येथून जिल्ह्यात एंट्री करणार्या बर्ड फ्लूने आता मोताळा आणि शेगाव तालुक्यातही घुसखोरी केली आहे. तिथे घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल आज, 7 जानेवारीला प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा पुन्हा हादरून गेली आहे. दोन्ही तालुक्यांतील संसर्ग परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील भानखेड येथून जिल्ह्यात एंट्री करणार्‍या बर्ड फ्लूने आता मोताळा आणि शेगाव तालुक्यातही घुसखोरी केली आहे. तिथे घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल आज, 7 जानेवारीला प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा पुन्हा हादरून गेली आहे. दोन्ही तालुक्यांतील संसर्ग परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
मोताळा तालुक्यातील सारोळापीर येथील दयासागर डोंगरे आणि शेगाव तालुक्यातील भोलपुरा येथील शुभम राजगुरे यांच्याकडील कोंबड्या 8 दिवसांपूर्वी मृत पावल्या होत्या. भोपाळ येथील प्रयोग शाळेतून याबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संसर्ग केंद्रापासून 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून तर 2 कि.मी. परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केल्याची मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी आज केली आहे. संसर्गाने बाधित असलेल्या परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी जलद कृती दल सोपस्कार पार पाडत आहेत. निगराणी क्षेत्रात 21 दिवस अंडी व पशुखाद्य वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत.