मोताळ्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू; दिवसभरात जिल्ह्यात 36 नवे रुग्ण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आज, 15 जानेवारीला आणखी एक बळी घेतला असून, मोताळा येथील नांदुरा रोड भागातील 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान स्त्री रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात नवे 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 26 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आज, 15 जानेवारीला आणखी एक बळी घेतला असून, मोताळा येथील नांदुरा रोड भागातील 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान स्त्री रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात नवे 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 26 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 730 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 694 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 36 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 29 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 584 तर रॅपिड टेस्टमधील 110 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर ः 10, बुलडाणा तालुका : भादोला 1, शेलसूर 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : अंत्री खेडेकर 1, नांदुरा शहर : 2, देऊळगाव राजा शहर : 2, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : सारोळा मारोती 1, मेहकर तालुका : कल्याणा 1, लोणार शहर : 4, सिंदखेड राजा तालुका : दुसरबीड 1, शेगाव शहर : 7

26 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आज 26 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः सिंदखेड राजा : 1, खामगाव : 1, चिखली : 7, नांदुरा : 1, बुलडाणा : अपंग विद्यालय 7, स्त्री रुग्णालय 7, मेहकर : 1, लोणार : 1.

327 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 96134 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12720 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 556 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13205 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 327 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 158 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.