मोताळ्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; ‘विघ्नहर्ता’ केले लक्ष्य!

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा शहरातील वाढत्या चोऱ्या सध्या चिंतेचा विषय बनला आहे. चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने व्यापारी संताप व्यक्त करत आहेत. 19 व 20 मार्चला आणखी दोन चोऱ्या समोर आल्या आहेत. मोताळा हे बोराखेडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. पहिली चोरी ः ग्रामीण रुग्णालयाच्या मागील गुरांच्या गोठ्यांतून चोरट्यांनी 19 मार्चच्या रात्री 5 …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोताळा शहरातील वाढत्‍या चोऱ्या सध्या चिंतेचा विषय बनला आहे. चोऱ्या रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने व्‍यापारी संताप व्‍यक्‍त करत आहेत. 19 व 20 मार्चला आणखी दोन चोऱ्या समोर आल्या आहेत. मोताळा हे बोराखेडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते.

  • पहिली चोरी ः ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या मागील गुरांच्‍या गोठ्यांतून चोरट्यांनी 19 मार्चच्‍या रात्री 5 पैकी 1 गायरान गाय चोरट्यांनी चोरून नेली.
  • दुसरी चोरी ः 20 मार्चला डॉ. महाजन यांच्‍या दवाखान्याच्‍या बाजूला असलेल्या मुख्य रस्‍त्‍यावरील विघ्नहर्ता ट्रेडर्स दुकान फोडून सिगारेट बिडीसह 10 रुपयांची रोकड असा एकूण 40 हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत भूषण कराडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. या दुकानातील चोरी सीसीटीव्‍हीत कैद झाली आहे.