मोबाइलवर कॉल आला म्‍हणून झोपडीबाहेर पडले अन्‌ अंगावर वीज कोसळली!; जागीच मृत्‍यू, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आवार (ता. खामगाव) येथे आज, ९ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. रामदास पांडुरंग मांजरे (३४, रा. आवार, ता. खामगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे. शुभम भिकाजी कुउटकार (२४)जखमी झाला आहे.मांजरे हे पेरणी करण्यासाठी त्यांच्या आवार शिवारातील शेतात गेले होते. पेरणी सुरू असताना …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आवार (ता. खामगाव) येथे आज, ९ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. रामदास पांडुरंग मांजरे (३४, रा. आवार, ता. खामगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे. शुभम भिकाजी कुउटकार (२४)जखमी झाला आहे.
मांजरे हे पेरणी करण्यासाठी त्यांच्या आवार शिवारातील शेतात गेले होते. पेरणी सुरू असताना पाऊस आला. त्‍यामुळे त्यांनी व शेतातील मजूर महिलांनी शेतातीलच झोपडीचा आसरा घेतला. झोपडीत असताना त्यांना फोन आल्याने ते झोपडीच्या बाहेर आले आणि तेवढ्यात त्यांच्यावर वीज कोसळली. त्यांच्यासोबत असलेला शुभम कुउटकार जखमी झाला. दोघांनाही तातडीने खामगाव शहरातील सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी रामदास मांजरे यांना मृत घोषित केले. शुभमवर उपचार सुरू आहेत.