मोबाइलवर बोलण्यावरून पतीने रागावले…तिने मुलासह घर सोडले; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून रात्री पतीसोबत भांडण झाले अन् सकाळी 2 वर्षांच्या मुलाला घेऊन विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. या प्रकरणी बेपत्ता विवाहितेच्या पतीने आज, 8 एप्रिलला शहर पोलीस ठाण्यात बायको आणि मुलगा हरवल्याची तक्रार दिली आहे. कोमल विकी जाधव (22), वेदांश विकी जाधव (2, रा. मलकापूर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  मोबाइलवर बोलण्याच्‍या कारणावरून रात्री पतीसोबत भांडण झाले अन्‌ सकाळी 2 वर्षांच्या मुलाला घेऊन विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. या प्रकरणी बेपत्ता विवाहितेच्या पतीने  आज,  8 एप्रिलला शहर पोलीस ठाण्यात बायको आणि मुलगा हरवल्याची तक्रार दिली आहे.

कोमल विकी जाधव (22), वेदांश विकी जाधव (2, रा. मलकापूर रोड ,बुलडाणा) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. 4 एप्रिलच्या रात्री 9 वाजता कोमलचे पती विकीसोबत मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. सकाळी  विकी जाधव झोपेतून उठले असता त्यांना पत्‍नी कोमल आणि मुलगा वेदांश घरी दिसून आले नाहीत. तेव्हापासून तर आजपर्यंत नातेवाईक आणि इतरत्र शोध घेऊनही मिळून न आल्याने विकी जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात आज तक्रार दिली.