म्हणे असे करतात मतदान… आपल्या उमेदवाराला मतदान करतानाचा व्हिडिओ केला व्हायरल; खामगाव तालुक्यातील प्रकार

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदान कशाप्रकारे करावे, असे सांगण्याचा बहाणा करून ठराविक उमेदवारांना मतदान करतानाचा स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न एका भामट्याने केला आहे. ही घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथूनच जवळ असलेल्या भंडारी येथे घडली. मतदान चालू असताना 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता त्याने हा प्रकार …
 

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदान कशाप्रकारे करावे, असे सांगण्याचा बहाणा करून ठराविक उमेदवारांना मतदान करतानाचा स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न एका भामट्याने केला आहे. ही घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथूनच जवळ असलेल्या भंडारी येथे घडली. मतदान चालू असताना 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता त्याने हा प्रकार केला. या प्रकरणाची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आल्यानंतर तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी पिंपळगाव राजा पोलिसांना पत्र देत त्याच्याविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहे.

रामकिसन बालचंद चव्हाण यांच्यासह दोघांनी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदारांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. तक्रारकर्ते वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत होते. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचे प्रतिनिधी प्रताप आत्माराम घोती याने मतदान करतानाचे व्हिडिओ शूटिंग काढून गावातील लोकांना कशा प्रकारे मतदान करावे असा सूचक व्हिडीओ तयार करून व्हायरल केला. या व्हिडीओत तक्रारक्रत्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावासमोरील जग, चावी व बस या निशाणी समोरील बटन दाबताना व्हिडिओ चित्रात स्पष्ट दिसत आहे. तपास पोलिस करत आहेत.