…म्‍हणून आमदार गायकवाड यांनी जोडले नागरिकांना हात!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुख्यमंत्री जनतेला हात जोडून थकले की विनाकारण घराबाहेर पडू नका. पण तरीही लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सध्या कोरोनावरील उपचाराची साधने कमी पडत आहेत. बेड अपुरे पडत आहेत, इंजेक्शन, लसीचा तुटवडा आहे. ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा आहे… अशा स्थितीत बुलडाण्याचे आमदार संजय …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाची स्‍थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुख्यमंत्री जनतेला हात जोडून थकले की विनाकारण घराबाहेर पडू नका. पण तरीही लोक ऐकण्याच्‍या मनःस्‍थितीत नाहीत. सध्या कोरोनावरील उपचाराची साधने कमी पडत आहेत. बेड अपुरे पडत आहेत, इंजेक्‍शन, लसीचा तुटवडा आहे. ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा आहे… अशा स्‍थितीत बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी नागरिकांना हात जोडून विनंती केली आहे. पहा व्हिडिओत त्‍यांनी केलेले आवाहन…

दिला 1 कोटीचा निधी
आरोग्‍य यंत्रणेला हातभार लागावा म्‍हणून आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी कोविडच्‍या प्रतिबंधक उपाययोजनांकरिता दिला आहे. यासंदर्भात त्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जिल्हा सामान्य रुग्‍णालयात सुरू झालेल्या कोविड रुग्‍णालयासाठी अतिरिक्‍त 7 एनआयसीयू व्‍हेंटिलेटर्स, एक कार्डियॉक ॲम्‍ब्‍युलन्‍स, 15 हजार रेमडेसिवीर इंजेक्‍शन खरेदीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी देऊन हे साहित्‍य लवकरात लवकर खरेदी करावे, असे पत्रात म्‍हटले आहे.