… म्‍हणून तिने विजेचा धक्का स्वतःहून लावून घेतला; २० वर्षीय युवतीच्या आत्महत्येचे कारणही SHOCKING !

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विजेचा धक्का लागून शुभांगी महादेव आढाव या २० वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी सायंकाळी टाकळी वाघजाळ (ता. मोताळा) येथे समोर आली होती. मात्र हा अपघात नसून, तिने स्वतःच विजेचा धक्का लावून आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात केली आहे. तिच्या आत्महत्येला दोन तरुणांना जबाबदार धरले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विजेचा धक्का लागून शुभांगी महादेव आढाव या २० वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी सायंकाळी टाकळी वाघजाळ (ता. मोताळा) येथे समोर आली होती. मात्र हा अपघात नसून, तिने स्वतःच विजेचा धक्का लावून आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात केली आहे. तिच्‍या आत्‍महत्‍येला दोन तरुणांना जबाबदार धरले असून, त्‍यांच्‍या त्रासाला कंटाळून तिने आत्‍महत्‍या केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यामुळे पोलिसांनी या दोन तरुणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

अमोल शिराळा (रा. टाकळी वाघजाळ) व योगेश शिराळ (रा. मलकापूर) अशी या तरुणांची नावे आहेत. हे दोघे शुभांगीला नेहमी धमकावत होते. “तू अमोलसोबत लग्न कर अन्यथा तुझ्या आई, वडील, काका यांना ठार मारू’ अशी धमकी दोघांनी शुभांगीला दिली होती. त्यामुळे ती तणावात राहत होती. दोघांच्या जाचाला कंटाळून तिने विजेचा धक्का लावून घेत आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २० जुलै रोजी घरचे शेतात गेल्याने शुभांगी दुपारच्या वेळी घरी एकटीच होती. त्यावेळी तिने विजेचा धक्का लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर शुभांगी घरात पडून होती. सायंकाळी तिची आई घरी आली असता ती बेशुद्धावस्थेत दिसली. नातेवाइकांनी तिला तात्काळ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.