…म्‍हणून देऊळगाव राजातील दवाखाने फुल्ल!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वातावरणातील बदलामुळे ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाले आहेत.यामुळे अनेक दवाखान्यांत बेड अपुरे पडत आहेत, तर कुठे सलाइन लावण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागत असल्याचे चित्र आज दिसून आले.तालुक्यात तीन-चार दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. परिणामी ताप, सर्दी, खोकला, हातपाय दुखी या आजारांनी डोके वर …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्‍हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वातावरणातील बदलामुळे ग्रामीण रुग्‍णालयासह खासगी दवाखाने रुग्‍णांनी फुल्ल झाले आहेत.यामुळे अनेक दवाखान्यांत बेड अपुरे पडत आहेत, तर कुठे सलाइन लावण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागत असल्याचे चित्र आज दिसून आले.
तालुक्यात तीन-चार दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. परिणामी ताप, सर्दी, खोकला, हातपाय दुखी या आजारांनी डोके वर काढले आहे. सध्या जिल्ह्यात लाॅकडाऊन आहे. नागरिकांनी दवाखान्यासाठी पैसे कुठून आणायचे, रोजगार बंद, व्यवसाय बंद आणि त्‍यातच आता रोगराईने डाेके वर काढले आहे. त्‍यामुळे सामान्‍य जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. रक्त तपासणीकरिता 350, सलाईनकरिता 250, डॉक्टर फी 100, मेडिकल वेगळेच त्यामुळे एका रुग्णास हजार रुपये तरी खर्च येतो. हा खर्च कुठून करायचा असा प्रश्न त्‍यांना पडलेला असतो.
डॉक्‍टर म्‍हणतात घाबरून जाऊ नका…
याबाबत डॉ. अमोल कोल्हे व डाॅ. खांडेभराड यांनी सांगितले, की वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्‍याची लक्षणे दिसून येतात. मात्र त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. ही काही कोरोनाचे लक्षणे नाहीत.