यंत्रणा ‘संडे मूड’मध्ये! नमुने संकलन व चाचण्यांचा मंदावला वेग, रुग्ण संख्येत तांत्रिक घट!!; 118 नवे बाधित

बुलडाणा (संजय मोहितेः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या संख्येने स्वॅब नमुने संकलन व अहवाल देणाऱ्या आरोग्य यंत्रणांचा रविवारी नमुने संकलन व तपासणीचा वेग मंदावल्याने कोरोना रुग्ण संख्येत तांत्रिक घट झाल्याचे दिसून आले. आज, 1 मार्चचा पॉझिटिव्हचा आकडा 118 असला तरी तो वस्तुस्थितीपर नाही. यामुळे आरोग्य यंत्रणा कदाचित रविवारी सुटीच्या मूडमध्ये …
 

बुलडाणा (संजय मोहितेः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या संख्येने स्वॅब नमुने संकलन व अहवाल देणाऱ्या आरोग्य यंत्रणांचा रविवारी नमुने संकलन व तपासणीचा वेग मंदावल्याने कोरोना रुग्ण संख्येत तांत्रिक घट झाल्याचे दिसून आले. आज, 1 मार्चचा पॉझिटिव्हचा आकडा 118 असला तरी तो वस्तुस्थितीपर नाही. यामुळे आरोग्य यंत्रणा कदाचित रविवारी सुटीच्या मूडमध्ये असाव्या, अशी मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मागील सातआठ दिवसांत आरटीपीसीआर व रॅपिड या दोन्हींसाठी मोठ्या संख्येने स्वॅब नमुने संकलित करण्याचा धडाका आरोग्य यंत्रणांनी लावला होता. या अवधीत सरासरी 3 हजार नमुने संकलित करण्यात आले. याला तोडीस तोड अहवालांची संख्या होती, यामुळे रुग्ण संख्या वाढली तरी पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला. याला आजची कामगिरी नकोसा अपवाद ठरली. जेमतेम 1303 स्वॅब व त्यातही केवळ 557 अहवाल प्राप्त होणे ही आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. यातील 557 अहवाल निगेटिव्ह तर 118 पॉझिटिव्ह आले. परिणामी 161 व मागील 9174 मिळून तब्बल 9335 अहवाल पेंडिंग असल्याचे चित्र आहे. यामुळे तालुकानिहाय आकडेवारी घसरलेली दिसून येते. यातही बुलडाणा तालुक्याने (25रुग्ण) आपला पहिला क्रमांक सोडला नाही. मलकापूर 24, खामगाव 19, शेगाव 13 हे तालुके आपले क्रम टिकवून आहेत.