यंदाची संक्रांत जास्तच गोड! तीळ-गुळाचे दर गेल्यावर्षीपेक्षा कमी!!

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मकरसंक्रांत हा सण तिळगूळ वाटून साजरा करतात. महिला घरोघरी जाऊन एकमेकींना वाण आणि तिळगूळ देऊन हा सण साजरा करतात. मागील काही महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे जनता आणि व्यापारी वर्ग परेशान आहे. काही प्रमाणात व्यापार पूर्वपदावर येत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी तीळ आणि गुळाचे भाव कमी आहेत. तीळ …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मकरसंक्रांत हा सण तिळगूळ वाटून साजरा करतात. महिला घरोघरी जाऊन एकमेकींना वाण आणि तिळगूळ देऊन हा सण साजरा करतात. मागील काही महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे जनता आणि व्यापारी वर्ग परेशान आहे. काही प्रमाणात व्यापार पूर्वपदावर येत आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी तीळ आणि गुळाचे भाव कमी आहेत. तीळ मागच्या वर्षी 150 रुपये किलो आणि गूळ 50 रुपये किलो होते. यावर्षी तीळ 120 रुपये किलो आणि गूळ 40 रुपये किलो आहे. मकर संक्रांत हा सण काही दिवसांवर येऊनही बाजारपेठेत शुकशुकाट आहे. दुकानदार हे ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेले आहेत. संक्रांतीला दोन दिवस शिल्लक आहेत; पण या दोन दिवसांत ग्राहकांची गर्दी उसळेल, अशी अपेक्षा व्यापारी ठेवून आहेत. सर्व जनतेला नवीन वर्ष आणि संक्रांत तिळगुळाच्या माध्यमातून गोडगोड जावो, अशी अपेक्षा व्यापारी वर्ग करत आहेत.