यंदा लेट पण पोटभर…. गावरानसाठी थोडा इंतजार…

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उन्हाळ्याची चाहुल लागली की सर्वांना वेध लागतात ते आमरसाचे. यंदा थंडी उशिरा पडल्यामुळे आंब्याला जरा उशीराच मोहर फुटला. त्यामुळे गावरान आंब्याची चव चाखण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बीच्या हंगामातही शेतकर्यांना पुरेसे पाणी आहे. अजूनही नद्या, नाले व ओढ्यांना पाणी असल्याने गावरान आंब्याला …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उन्हाळ्याची चाहुल लागली की सर्वांना वेध लागतात ते आमरसाचे. यंदा थंडी उशिरा पडल्यामुळे आंब्याला जरा उशीराच मोहर फुटला. त्यामुळे गावरान आंब्याची चव चाखण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बीच्या हंगामातही शेतकर्‍यांना पुरेसे पाणी आहे. अजूनही नद्या, नाले व ओढ्यांना पाणी असल्याने गावरान आंब्याला चांगला मोहर फुटला आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये बघायला येणारा मोहर यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पहायला मिळायला. मोहर येण्यासाठी आवश्यक एवढी थंडी उशिरा पडल्याने मोहर सुद्धा उशिरा आल्याचे कृषी विज्ञान केंद्र बुलडाणाचे वैज्ञानिक नितिन गुप्ता यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले. यावर्षी आलेला हा मोहर टिकवून ठेवण्यासाठी मोहरावर आंतरप्रवाही औषधाची फवारणी करावी. जेणेकरून फुलकिड्याच्या प्रभावामुळे मोहर गळून पडणार नाही. आंब्यासाठी यावर्षीचे हवामान अनुकूल आहे. त्यामुळे लेट का होईना गावरान आंब्याचे चांगले उत्पादन यावर्षी होईल, असे कार्यालयीन कृषी अधिकारी राजू येवले यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.