यंदा वरूणराजाने घेतले 9 बळी! पुरात वाहून गेल्याने चौघे दगावले!! वारसांना 24 लाखांची मदत

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लाखो हेक्टरवरील पिकांना जीवदान देणाऱ्या पावसाळ्याने आजअखेर 9 जणांचे बळी घेतल्याचे दुर्दैवी वृत्त आहे. यापैकी 6 जणांच्या वारसांना 24 लाखांची सानुग्रह मदत करण्यात आली आहे. यंदा पावसाने लहरीपणा दाखवत अनियमित हजेरी दाखविली. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असतानाच नजीकच्या काळात पाणी समस्या तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली. …
 
यंदा वरूणराजाने घेतले 9 बळी! पुरात वाहून गेल्याने चौघे दगावले!! वारसांना 24 लाखांची मदत

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लाखो हेक्टरवरील पिकांना जीवदान देणाऱ्या पावसाळ्याने आजअखेर 9 जणांचे बळी घेतल्याचे दुर्दैवी वृत्त आहे. यापैकी 6 जणांच्या वारसांना 24 लाखांची सानुग्रह मदत करण्यात आली आहे.

यंदा पावसाने लहरीपणा दाखवत अनियमित हजेरी दाखविली. यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असतानाच नजीकच्या काळात पाणी समस्या तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली. मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या दमदार व कोसळधार पावसाने पिकांना जीवदान देतानाच नदी, नाले धरणे, हाऊसफुल्ल करून टाकले. मात्र जीवनदायी ठरलेल्या याच पावसाळ्याने आजअखेर तब्बल 9 जणांचे बळी घेतले आहेत. मुसळधार पावसाने घराची भिंत कोसळून विठोबा जाधव (देऊळगाव धनगर, ता. चिखली) व आशियाबी पठाण (अंजनी बुद्रूक, ता. मेहकर) या दोघांचा मृत्यू झाला. यंदा विजेच्या बळींची संख्या तुलनेने कमी आहे. रामदास मांजरे ( आवार ता. खामगाव) व रमेश तायडे( हरणखेड ता. मलकापूर) या दोघांचा अंगावर वीज पडून करून अंत झाला. मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी दिगंबर टेकाडे यांचा अंगावर झाड कोसळून दुर्दैवी अंत झाला.

पुराचे सर्वाधिक बळी
उशिराने म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने ठिकठिकाणी नदी, नाल्यांना आलेल्या पुरात वाहून चौघांचा मृत्यू झाला. यात धनराज हांडे (भोसा, ता. मेहकर), मंगला शिंगणे (सिंदखेड राजा), आदित्य गवई (जवळा पळसखेड ता. शेगाव) आणि ओम गव्हाळे (पातोडा ता. नांदुरा) यांचा समावेश आहे. यापैकी आशियाबी, शिंगणे, गव्हाळे यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली नाहीये!