यापुढे शेतकर्‍यांची पिळवणूक कराल सेना स्टाइलने उत्तर देईल… कापूस खरेदी केंद्रात जाऊन माजी आमदार डॉ. खेडेकरांनी भरला दम!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राबाबत शेतकर्यांकडून वारंवार तक्रारी येत असल्यामुळे आज, 9 जानेवारीला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शासकीय ग्रेडर डुकरे यांना त्यांनी धारेवर धरले. यापुढे शेतकर्यांची पिळवणूक झाली तर …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्राबाबत शेतकर्‍यांकडून वारंवार तक्रारी येत असल्यामुळे आज, 9 जानेवारीला माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शासकीय ग्रेडर डुकरे यांना त्यांनी धारेवर धरले. यापुढे शेतकर्‍यांची पिळवणूक झाली तर शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील व झोनल मॅनेजर शेगाव यांच्याशी फोनव्दारे संवाद साधून त्यांनी या ठिकाणची परिस्थिती सांगितली. देऊळगाव राजा येथील शासकीय खरेदी केंद्रावर अजून एक ग्रेडर वाढवावा, अशी सूचना त्यांनी केली. तालुक्यातील शेतकर्‍यांचा जास्तीत जास्त कापूस खरेदी करा. शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारच्या आडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या अन्यथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करेल, असा दम यावेळी डॉ. खेडेकर यांनी बाजार समिती व शासकीय ग्रेडरला भरला. यावेळेस बाजार समितीचे सचिव श्री. म्हस्के, माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, तालुकाप्रमुख दादाराव खारडे, उपशहर प्रमुख अविनाश डोईफोडे, अतिश खरात, अभय दीडहाते, सचिन व्यास, शिवहारी गिते आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.