…यामुळे आहे ढगाळ वातावरण, बुधवारपासून 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता, ‘हवामान’ चा अंदाज

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्या बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील बहुतेक गावांच्या डोक्यावरील आकाश ढगाळलेले असल्याने लाखो शेतकरी बुचकळ्यात आणि चिंतित झाले आहेत. याचे कारण हवामान केंद्राने उद्या, 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जिल्ह्यात किंचित पावसाळी माहौल तयार झालाय! पंजाबराव कृषी विद्यापीठाशी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सध्या बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील बहुतेक गावांच्या डोक्यावरील आकाश ढगाळलेले असल्याने लाखो शेतकरी बुचकळ्यात आणि चिंतित झाले आहेत. याचे कारण हवामान केंद्राने उद्या, 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्‍या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जिल्ह्यात किंचित पावसाळी माहौल तयार झालाय!

पंजाबराव कृषी विद्यापीठाशी  संलग्न बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रातील जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे ही माहिती देण्यात आली. नागपूर स्थित प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज वर्तविला आहे. यानुसार 17 ते 20 मार्च या 4 दिवसांदरम्यान जिल्ह्यातील तुरळक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान काही ठिकाणी मेघ गर्जनासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही आहे. यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःसह पशुधन, कापणी केलेल्या पिकांची सुरक्षित स्थळी साठवण करावी. ते शक्य न झाल्यास शेतमाल प्लास्टिक शिटने झाकून ठेवावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.