याला म्हणतात प्रामाणिकपणा… जिलेबी खाताना हरवलेले 1 लाख शेतकर्‍याला असे मिळाले परत!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धामणगाव बढे येथील शेतकरी रामकृष्ण लक्ष्मण मापारी यांची 1 लाख रुपये रक्कम असलेली बॅग मलकापुरातील हनुमान चौकातील हरियाणा जिलेबी सेंटर येथून लंपास झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली होती. शेतकर्याला जिलेबी पडली 1 लाखात या मथळ्याखाली बुलडाणा लाइव्हने याबाबत वृत्त दिले होते. शेतकर्याची पैशांची बॅग जिलेबी सेंटरमधील मॅनेजरलाच सापडल्याने मॅनेजरने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धामणगाव बढे येथील शेतकरी रामकृष्ण लक्ष्मण मापारी यांची 1 लाख रुपये रक्कम असलेली बॅग मलकापुरातील हनुमान चौकातील हरियाणा जिलेबी सेंटर येथून लंपास झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली होती. शेतकर्‍याला जिलेबी पडली 1 लाखात या मथळ्याखाली बुलडाणा लाइव्हने याबाबत वृत्त दिले होते. शेतकर्‍याची पैशांची बॅग जिलेबी सेंटरमधील मॅनेजरलाच सापडल्याने मॅनेजरने ती बॅग त्यातील 1 लाख रुपयांसह पोलीस ठाण्यात जमा करत प्रमाणिकतेचे दर्शन घडवले आहे. प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल हॉटेलचे मॅनेजर एकनाथ भगत यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


5 फेब्रुवारी रोजी शेतकरी रामकृष्ण मापारी यांनी त्यांचा मका विक्रीसाठी आणला होता. विक्रीनंतर त्यातून मिळालेले एक लाख रुपये घेऊन ते हरियाणा जिलेबी सेंटरवर जिलेबी खायला थांबले होते. जिलेबी खाल्ल्यानंतर 1 लाख रुपयांची बॅग लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी नाकाबंदी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. मात्र ती बॅग गाडीवरून पडून मॅनेजर एकनाथ भगत यांना सापडली होती. त्यांनी याबाबतची माहिती हरियाणा जिलेबी सेंटरचे मालक ओमप्रकाश भट्टड यांना दिली. दोन दिवस उलटूनही बॅग घेण्यासाठी कुणीही न आल्याने 8 फेब्रुवारी रोजी ओमप्रकाश भट्टड आणि मॅनेजर भगत यांनी ही बॅग पोलीस ठाण्यात आणून दिली. पोलीस निरीक्षक काटकर यांनी शेतकर्‍याला याबाबत माहिती देऊन ठाण्यात बोलावून घेतले. प्रामाणिकपणा दाखवून एक लाख रुपयांची बॅग परत करणार्‍या मॅनेजर एकनाथ भगत व मालक ओमप्रकाश भट्टड यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांनी सत्कार केला. तसेच शेतकरी रामकृष्ण मापारी यांना 1 लाख रुपयांची बॅग परत करण्यात आली.