याला म्‍हणतात ‘शाळा’… मकाच्‍या मधोमध लावली गांजाची झाडे!; हिवरा आश्रमच्‍या शेतकऱ्याला अटक

हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मकाच्या पिकात गांजाची झाडे लावणाऱ्या बहाद्दर शेतकऱ्याला साखरखेर्डा पोलिसांनी जेरबंद केले आहे. काल, 12 एप्रिलच्या सकाळी हा प्रकार हिवरा आश्रम (ता. मेहकर) शिवारात समोर आला. शिवाजी त्र्यंबक शेळके (55, रा. हिवरा आश्रम) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेळके याच्या शेतात गांजाचे पीक असल्याची माहिती साखरखेर्डा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी …
 

हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मकाच्या पिकात गांजाची झाडे लावणाऱ्या बहाद्दर शेतकऱ्याला साखरखेर्डा पोलिसांनी जेरबंद केले आहे. काल, 12 एप्रिलच्‍या सकाळी हा प्रकार हिवरा आश्रम (ता. मेहकर) शिवारात समोर आला.

शिवाजी त्र्यंबक शेळके (55, रा. हिवरा आश्रम) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शेळके याच्‍या शेतात गांजाचे पीक असल्याची माहिती साखरखेर्डा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा मारला असता 500 ग्रॅम गांजा जप्‍त करण्यात आला. शिवाजी शेळकेला अटक करण्यात आली आहे. शेतातील झोपडीत 2 किलो 392 ग्रॅम गांजा आढळला. शेतातील मकाच्‍या पिकाची पाहणी केली असता त्‍यात मधोमध गांजाची झाडेही लावलेली दिसली. एकूण 26 किलो  500 ग्रॅम गांजा जप्‍त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक दीपक राणे, पोहेकाँ श्री. मुंढे, नापोकाँ श्री. काशपाग, पोकाँ श्री. धुड, मपोकाँ रमा गवई यांनी केली. त्‍यांना शासकीय पंच गणेश राजगुरू, नीलेश कहाळे यांनी सहकार्य केले.