या कृत्‍याला काय म्‍हणावे…? शेतातील फळे लगडलेली ३० पपईची झाडे विकृताने तोडली!; शेतकरी हवालदील, मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विकृतीचा कळस गाठणारी घटना मेहकर तालुक्यात समोर आली आहे. उकळी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील ३० पपईची झाडे कुणीतरी विकृताने तोडून टाकली. काल, १६ जुलैला सकाळी ही बाब समोर आल्यानंतर शेतकरी हवालदील झाला आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, नुकसान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विकृतीचा कळस गाठणारी घटना मेहकर तालुक्‍यात समोर आली आहे. उकळी येथे एका शेतकऱ्याच्‍या शेतातील ३० पपईची झाडे कुणीतरी विकृताने तोडून टाकली. काल, १६ जुलैला सकाळी ही बाब समोर आल्यानंतर शेतकरी हवालदील झाला आहे. या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, नुकसान करणाऱ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला लवकरात लवकर शोधण्यासाठी मागणी ग्रामस्‍थ करत आहेत.

जयराम विश्वनाथ सावंत (३९, रा. उकळी) हे सेलू (जि. परभणी) येथे लग्‍नासाठी गेले होते. त्‍यांचे वडील विश्वनाथ सखाराम सावंत शेतात म्‍हशीला पाणी पाजण्यासाठी सकाळी सव्वा अकराला गेले असता त्‍यांना शेतात लावलेली पपईची झाडे तोडून टाकलेली दिसली. त्‍यांनी मुलाला ही माहिती दिली. त्‍यामुळे जयराम सावंत तातडीने घरी परतले. शेतात पाहणी केली असता दहा गुंठ्यांत लावलेली पपईची ३० झाडे कुणीतरी तोडलेली आढळली. ही झाडे फळांनी लगडलेली होती. यात सावंत यांचे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी माथेफिरूविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोहेकाँ रामेश्वर कोरडे करत आहेत.