‘या’ संघटनेला बोगस बियाणे विक्रीचा संशय; कृषी विभागाला पथक स्‍थापन करण्यासाठी दिले निवेदन

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खरीप हंगामात बोगस बियाणे विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जवळपास सर्वच सोयाबीन, कपाशी, मूग पीक उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे यंदा दर्जेदार घरगुती सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडे कंपन्याचे महागडे बियाणे खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कृषी विभागाने बोगस बियाणे विक्री …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खरीप हंगामात बोगस बियाणे विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी जवळपास सर्वच सोयाबीन, कपाशी, मूग पीक उद्‌ध्वस्‍त झाले होते. त्‍यामुळे यंदा दर्जेदार घरगुती सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्याकडे कंपन्याचे महागडे बियाणे खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. त्‍यामुळे कृषी विभागाने बोगस बियाणे विक्री करणारे व निर्मिती करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर ठोस करवाई करावी अन्यथा शिवसंग्राम संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका कृषी अधिकाऱ्यांना तालुकाध्यक्ष राजेश इंगळे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदन देताना जहीर खान पठाण, अमजत खान, संतोष हिवाळे, अयाज पठाण, चंद्रभान झिने आदी उपस्थित होते.