या ३ वर्षांच्‍या बुलडाणेकर चिमुकल्याची अचाट स्मरणशक्‍ती पाहून तुम्‍हीही म्‍हणाल, ओह माय गॉड!

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तो अवघ्या ३ वर्षांचा आहे… पण त्याची स्मरणशक्ती अचाट आहे… जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवण्याचा विक्रमच त्याच्या नावावर नोंदवला गेलाय! बुलडाणा शहरातील विष्णूवाडीतील अनिल तांबट यांचा हा नातू होय…! त्रिशान संदीप तांबट या बुलडाणेकर चिमुकल्याने सध्या भल्याभल्यांना चकीत केलंय… त्याच्या आईने “बुलडाणा लाइव्ह’ला संपर्क केला तेव्हा सुरुवातीला …
 
या ३ वर्षांच्‍या बुलडाणेकर चिमुकल्याची अचाट स्मरणशक्‍ती पाहून तुम्‍हीही म्‍हणाल, ओह माय गॉड!

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तो अवघ्या ३ वर्षांचा आहे… पण त्‍याची स्‍मरणशक्‍ती अचाट आहे… जास्तीत जास्त गोष्टी लक्षात ठेवण्याचा विक्रमच त्‍याच्‍या नावावर नोंदवला गेलाय! बुलडाणा शहरातील विष्णूवाडीतील अनिल तांबट यांचा हा नातू होय…! त्रिशान संदीप तांबट या बुलडाणेकर चिमुकल्याने सध्या भल्याभल्यांना चकीत केलंय… त्‍याच्या आईने “बुलडाणा लाइव्ह’ला संपर्क केला तेव्हा सुरुवातीला आमचाही विश्वास बसला नाही, पण अनुभवाचे बोल म्‍हणावेत, बुलडाणा लाइव्हसुद्धा त्‍याच्‍या स्मरणशक्‍तीपुढे चकीत झाले आहे!

वंडर बॉय म्‍हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्‍याच्या हुशारीची नोंद झाली आहे. त्‍यामुळे बुलडाण्याच्‍या लौकिकात चिमुकल्याने घातलेली भरही कौतुकास्पदच म्‍हणावी. त्रिशान हा विष्णूवाडीतील नेमिनाथ भिकूशेठ तांबट (अण्णा कासार) यांचा पणतू आहे. त्रिशानने ही अचाट कामगिरी केली कशी याबद्दल त्‍याची आई सौ. तृप्तीताई म्‍हणाल्या, की कोरोनामुळे मुलांनी घरातच क्रीडांगण बनवले आहे. मुलांना व्यस्‍त ठेवण्यासाठी आई-वडिलांनाही कसरत करावी लागत आहे. त्‍यातूनच त्रिशानला व्यस्‍त ठेवण्यासाठी मी निरनिराळी पुस्तके वाचून दाखवायला सुरुवात केली. त्‍याला चित्र काढायला, ओळखायला शिकवले. त्‍याची स्मरणशक्‍ती प्रचंड असल्याचे लक्षात आल्यानंतर त्‍याचे व्हिडिओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स व ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्‌सकडे पाठवले होते. तेही अचंबित झाले असावेत, कारण त्‍यांनी लगेच त्‍याच्या या विक्रमाची नोंद केली.

या ३ वर्षांच्‍या बुलडाणेकर चिमुकल्याची अचाट स्मरणशक्‍ती पाहून तुम्‍हीही म्‍हणाल, ओह माय गॉड!

त्रिशान मराठी कविता, श्लोक, इंग्लिश कविता, मराठी स्वर, आठवड्याचे वार (मराठी अन्‌ इंग्लिशमध्येही), बारा महिने चटकन सांगतो. अवघ्या काही वेळात घरातील १११ वस्तू, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, फुले, फळे, पैसे, देव, संत, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भाज्या, नैसर्गिक गोष्टी, गाड्यांचे प्रकार, स्वातंत्र्यसेनानी, लोकप्रिय व्यक्ती, जेवायचे पदार्थ, कीटक, कार्टून, शरीराचे अवयव, रंग व आकार हे सांगतो. इंग्रजी वर्णमालेतील A ते Z म्हणणे, तेओळखणे, व्यवस्थित लावणे आणि त्याचे शब्द बोलणे तसेच अंक १ ते ३० पर्यंत इंग्रजीमध्ये व १ ते १५ मराठीतून बोलणे आणि व्यवस्थित लावणेसुद्धा जमते. विविध पक्षी आणि प्राणी यांचा आवाज ओळखणे आणि ३० विविध दैनंदिन कार्यसुद्धा त्याला सांगता येतात. त्रिशान अजून शाळेत जात नसूनही, त्याचे कलागुण थक्‍क करणारे आहेत. त्याच्या आईने चित्र, चिन्हे व व्यक्ती ओळखणे हेदेखील चित्र रेखाटून त्याला शिकवलेले आहे. त्रिशानचे वडील संदीप तांबट यांनी सांगितले की, त्रिशानची स्मरणशक्ती अगदीचांगलीआहे. त्याला चित्रकलेची पण फार आवड आहे. त्याने त्याच्या वयानुसार अगदी पहिला वहिला मोठा मान मिळवलाआहे. त्यामुळे त्याचा आम्हाला फार अभिमान आहे, असे ते म्‍हणाले.