युवकाची घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या; नांदुरा तालुक्‍यातील घटना

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः 22 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना इसापूर (ता. नांदुरा) येथे काल, 22 एप्रिलला दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सुमेध जगन हिवराळे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. सुमेधने लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या …
 

जलंब (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः 22 वर्षीय युवकाने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना इसापूर (ता. नांदुरा) येथे काल, 22 एप्रिलला दुपारी साडेतीनच्‍या सुमारास घडली. सुमेध जगन हिवराळे असे आत्‍महत्‍या करणाऱ्याचे नाव आहे.

सुमेधने लोखंडी पाईपला दोरीच्‍या साह्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी सुनील हिवराळे यांच्‍या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. आत्‍महत्‍येचे कारण आजही समोर आले नव्‍हते.