यूपीवाले आपलं साहित्‍य वापरणार!; बुलडाण्यातून कंटेनर भरून घेऊन गेले…!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यातील मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. यातील पहिल्या 2060 बॅलेट युनिटची (बियू) पहिली खेप रवाना झाली असून, याची उचल करण्यासाठी यूपीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक बुलडाणा येथे दाखल झाले होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी हे सदैव चर्चेत राहणारे राजकारणी आहेत. …
 
यूपीवाले आपलं साहित्‍य वापरणार!; बुलडाण्यातून कंटेनर भरून घेऊन गेले…!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यातील मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. यातील पहिल्या 2060 बॅलेट युनिटची (बियू) पहिली खेप रवाना झाली असून, याची उचल करण्यासाठी यूपीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक बुलडाणा येथे दाखल झाले होते.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी हे सदैव चर्चेत राहणारे राजकारणी आहेत. एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावी उत्तराधिकारी म्हणून त्यांची अधूनमधून चर्चा होते. यामुळे त्यांच्या नेतृत्वात सन 2022 मध्ये होणारी विधानसभेची निवडणूक आतापासूनच लक्षवेधी ठरली आहे. आता या निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्याचाही (तांत्रिक) सहभाग राहणार असल्याचे वृत्त आहे. तेथील लढतीत जिल्ह्यातील 4180 बॅलेट युनिटचा सहभाग राहणार आहे. या युनिटच्या स्कॅनिंगचे काम शहरातील सामाजिक भवनात पार पडले.

उपजिल्हाधिकारी ( निवडणूक ) गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून प्रकाश डब्बे यांच्या चमूने हे काम पार पाडले. त्यातील 2060 सयंत्रांची पहिली खेप कानपूरला रवाना झाली. पथकप्रमुख प्रेमप्रकाश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कडक पोलीस बंदोबस्तात एका कंटेनरद्वारे या बियू नेल्या. उर्वरित 2120 बियू घेण्यासाठी इटावा ( यूपी) येथील चमू येणार आहे.