‘येते का?’… मुलीच्या मोबाईलवर मॅसेज पाठवला अन्‌ पळवून नेले!; मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 21 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविल्याची घटना मोताळा तालुक्यातील नळकुंड येथे समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 4 एप्रिल रोजी रात्री मुलगी आईजवळ झोपली होती. रात्री 2 च्या सुमारास आईला जाग आली तेव्हा अंथरुणात मुलगी नसल्याचे दिसले. त्यामुळे शोधाशोध करूनही मुलगी …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 21 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविल्‍याची घटना मोताळा तालुक्यातील नळकुंड येथे समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

4 एप्रिल रोजी रात्री मुलगी आईजवळ झोपली होती. रात्री 2 च्या सुमारास आईला जाग आली तेव्हा अंथरुणात मुलगी नसल्याचे दिसले. त्यामुळे शोधाशोध करूनही मुलगी सापडली नाही. मुलीचा मोबाईल हा घरातच मिळून आला. तिच्‍या व्‍हॉट्‌स ॲपवर एका नंबरवरून बंजारी भाषेत आइची काइ (मराठीत येते का?) असा मॅसेज आल्याचे घरच्यांना दिसले. हा मोबाईल नंबर हा गावातीलच रवींद्र वासुदेव जाधव (21) याचा असल्याचे समोर झाले. मुलीच्या नातेवाईकांनी रवींद्र वासुदेव जाधव याचा शोध घेतला असता तो सुद्धा 4 एप्रिलच्या रात्रीपासून घरी नसल्याचे समजले. त्यावरून मुलीला रवींद्रनेच यानेच पळवले असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी काल पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.