येळगाव धरण ९७ टक्के भरले; रात्री उशिरापर्यंत शंभरी गाठणार!!; आमदार जलपूजन करताना काय म्‍हणतात वाचा…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरासह १३ गावांची तहान भागवणारे येळगावचे धरण (स्व. भोंडे सरकार जलाशय) आज, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत ९७ टक्के भरले. ऑगस्टच्या शेवटी धरणात केवळ २२ टक्के जलसाठा होता. त्यामुळे धरण भरेल की नाही याची चिंता बुलडाणावासीयांना होती. मात्र ६ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला अन् बुलडाणेकरांची चिंता मिटली. काल, …
 
येळगाव धरण ९७ टक्के भरले; रात्री उशिरापर्यंत शंभरी गाठणार!!; आमदार जलपूजन करताना काय म्‍हणतात वाचा…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरासह १३ गावांची तहान भागवणारे येळगावचे धरण (स्व. भोंडे सरकार जलाशय) आज, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत ९७ टक्के भरले. ऑगस्टच्या शेवटी धरणात केवळ २२ टक्के जलसाठा होता. त्यामुळे धरण भरेल की नाही याची चिंता बुलडाणावासीयांना होती. मात्र ६ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला अन्‌ बुलडाणेकरांची चिंता मिटली. काल, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ४८ टक्के भरलेले धरण सायंकाळपर्यंत ८५ टक्के भरले होते. आज सायंकाळी साडेसहापर्यंत धरणात ९७ टक्के जलसाठा होता. वृत्त लिहीत असतानासुद्धा मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरण १०० टक्के भरण्याची शक्यता अधिकारीक सूत्रांनी बुलडाणा लाइव्हकडे वर्तविली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी आज येळगावला धरणातील पाण्याचे पूजन केले. यावेळी ते म्हणाले, की येळगाव जलाशय भरले ही आनंदाची बाब आहे. बुलडाण्याची वाढती लोकसंख्या, ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या यामुळे यावर्षीच्या शेवटपर्यंत खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी बुलडाण्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याची चाचणीसुद्धा दिवाळीनंतर घेण्यात येईल. बुलडाणेकरांना दसरा किंवा दिवाळीनंतर रोज किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठीची योजना तयार झाली आहे. येळगाव जलाशय परिसरात २५ कोटी रुपये खर्च करून एक पर्यटन स्थळ उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. या वेळी नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, मो. सज्जाद, मृत्यूंजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, आरोग्य सभापती आशिष जाधव, बाळासाहेब धूड, विजय जायभाये, मुन्‍ना बेंडवाल, उमेश कापुरे व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.