रब्बी हंगामातील पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कृषी दिनामित्ताने रब्बी हंगाम 2020-21 मधील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार आज, 1 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कृषी दिनामित्ताने रब्बी हंगाम 2020-21 मधील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार आज, 1 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्‍या हस्ते करण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्ष मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत, जि.प कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, कृषि विकास अ‍धिकारी अनिसा महाबळे आदी उपस्थित होते.

रब्बी हंगामात पीक स्पर्धा आदिवासी गट व सर्वसाधारण गट अशा दोन गटात घेण्यात आली. हरभरा व गहू अशा दोन पिकांमध्ये जास्त हेक्टरी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना यावेळी जिल्हा व तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देवून सन्मानीत करण्यात आले. आदिवासी गटात हरभरा पिकासाठी हेक्टरी 39 क्विंटल उत्पादन घेणारे टिटवी ता. लोणार येथील शेतकरी संजय ज्ञानेश्वर चिभडे व हेक्टरी 32 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी भगवान आश्रुजी कोकाडे यांना अनुक्रमे विभाग स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकाने सन्मानीत करण्यात आले. तसेच सर्वसाधारण गटात हरभरा पिकासाठी विमलताई विजयराव टापरे ता. जळगाव जामोद प्रथम, विठ्ठल पंढरी पोफळे ता. लोणार द्वितीय व विजयकुमार पुंजाजी अंभोरे ता. चिखली यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यचप्रमाणे सर्वधारण गटात मेहकर तालुक्यातून हरभरा पिकामध्ये हेक्टरी 30 क्विंटल 10 किलो उत्पादन घेतल्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांचा प्रथम क्रमांक आला. त्यामुळे त्यांनाही प्रशस्तीपत्र पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे आदिवासी गटात जिल्हास्तरावर हरभरा पिकासाठी वच्छला नारायण कोकाटे ता. लोणार प्रथम, लक्ष्मण महादु घाटे ता. लोणार द्वितीय व गोदावरी भगवान कोकाटे ता. लोणार यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. जिल्हास्तरीय सर्वसाधारण गटात गहू पिकासाठी वसुधा विजय चांगडे ता. मेहकर, रोहीत शरद ठाकरे ता. मेहकर व दिपाली गजानन फराटे ता. मेहकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी पीक स्पर्धेविषयी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी माहिती दिली.