रविकांत तुपकरांच्या संकल्पनेतील उपक्रमाचे अमेरिकेतही कौतुक!

किन्होळा कोविड सेंटरला मिळालेत दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून किन्होळा येथे जिल्ह्यात प्रथमच साकारलेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरची ख्याती आता साता समुद्रापार पोहोचली आहे. हळूहळू या आयसोलेशन सेंटरचे रुपांतर कोरोना हॉस्पिटलमध्ये होत असून, केंद्राला आता थेट अमेरिकेतून दोन ऑक्सिजन …
 

किन्होळा कोविड सेंटरला मिळालेत दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून किन्होळा येथे जिल्ह्यात प्रथमच साकारलेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरची ख्याती आता साता समुद्रापार पोहोचली आहे. हळूहळू या आयसोलेशन सेंटरचे रुपांतर कोरोना हॉस्पिटलमध्ये होत असून, केंद्राला आता थेट अमेरिकेतून दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट मिळाले आहेत.

किन्होळा पॅटर्नची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी हा पॅटर्न जिल्हाभर राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असतानाच  राज्याच्या सचिवांनी देखील किन्होळा पॅटर्नचे कौतुक केले. दरम्यान या सेंटरमध्ये रुग्णांसाठी विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून समाजातील नागरिकांनी, दानशुरांनी हातभार लावण्यास सुरुवात केली. रविकांत तुपकर यांच्या या उपक्रमाची माहिती अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले त्यांचे मित्र तथा बुलडाणा येथील एकतानगरमधील रहिवासी आनंद बाबुराव जाधव यांना मिळाली. त्यांनी तुपकरांशी संपर्क साधून आपल्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी काहीतरी करण्याची तयारी दाखवत या उपक्रमाला हातभार लावण्याची तयारी दर्शविली आणि एक नव्हे तर दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट देण्याचा मानस व्यक्त केला.  २७ मे रोजी हे 2 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बुलडाण्यात पोहचले आणि आज, २८ मे रोजी किन्होळा आयसोलेशन सेंटर येथे दाखल झाले. किन्होळा गावातील रुग्णांना येथे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, आता ऑक्सिजनची देखील सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येथे आता किन्होळ्यासह पंचक्रोशीतील रुग्णांना देखील भरती करून घेतले जाईल, अशी माहिती रविकांत तुपकर यांनी बोलताना दिली.

आनंद जाधव अमेरिकेत असले तरी आपल्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आपणही काहीतरी मदत करावी, आपलेही सामाजिक उत्तरदायीत्व आहे या भावनेतून त्यांनी दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी तुपकर यांनी दिली. यावेळी रविकांत तुपकर, आनंद जाधव यांचे बंधू सचिन बाबुराव जाधव, प्रभुकाका बाहेकर, प्रा. जगदेवराव बाहेकर, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर आदींच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे पूजन करण्यात आले.  या आयसोलेशन सेंटरसाठी प्रा. जगदेवराव बाहेरकर यांनी अकरा हजार रुपयांची मदत यावेळी दिली. यावेळी डॉ.अनिल साळोख, डॉ. योगेश परिहार यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.