रस्‍ता आहे की घसरगुंडी! चिंचपूर-उंद्री दरम्‍यान दहा दिवसांत अनेक जण सटकले; कंत्राटदार बघतोय जीव जाण्याची वाट!!

खामगाव (भागवत राऊत) ः दोन- अडीच वर्षांपासून बाळापूर बायपास ते वरवंड फाटा या मार्गाचे काम अतिशय धीम्या गतीने चालू आहे. सध्या चिंचपूर ते उंद्री मार्गाचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी वाहनधारकांच्या सोयीचा कुठलाच विचार करण्यात येताना दिसून येत नाही. अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत. वाहनधारकांच्या सुविधेसाठी एक बाजू वाहतुकीस व्यवस्थित ठेवून दुसऱ्या बाजूचे काम …
 

खामगाव (भागवत राऊत) ः दोन- अडीच वर्षांपासून बाळापूर बायपास ते वरवंड फाटा या मार्गाचे काम अतिशय धीम्या गतीने चालू आहे. सध्या चिंचपूर ते उंद्री मार्गाचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी वाहनधारकांच्या सोयीचा कुठलाच विचार करण्यात येताना दिसून येत नाही. अनेक अपघात या रस्त्यावर होत आहेत.

वाहनधारकांच्या सुविधेसाठी एक बाजू वाहतुकीस व्यवस्थित ठेवून दुसऱ्या बाजूचे काम करणे अपेक्षित असताना या मार्गावर मात्र कंत्राटदाराने दोन्ही बाजू खोदून ठेवल्या आहेत. रस्त्या खोदून ठेवल्यामुळे काळ्या चिकन मातीच्याच रस्त्यावरून वाहतूक चालू आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी चिकन मातीवरून वाहने घसरून पडत आहेत. वाहने घसरून पडण्याच्या मागील दहा दिवसांत तीन- चार घटना घडल्या आहेत. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. पण मार लागल्याने शारीरिक, आर्थिक व वाहनांचे सुध्दा नुकसान झालेच आहे. मात्र तरीही कंत्राटदारांकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत.

कंत्राटदार अजून किती जणांची पडण्याची वाट पाहत आहेत? का एखाद्याचा जीव गेल्याशिवाय त्यांना जाग येणारच नाही? असा प्रश्न या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना पडला आहे. अपघातानंतर कंत्राटदारांकडून फक्त थातूरमातूर मुरूम टाकून वेळ मारून नेण्याचे प्रयत्न चालू आहेत. वाहनधारकांना एका बाजूस व्यवस्थित रस्ता करून देण्याची मागणी येथील स्थानिक करीत आहेत. अपघात ग्रस्त हे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी असल्याने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे सध्या नाही पूर्ण रस्ता तर रस्त्याची एक बाजू तरी व्यवस्थित करावी. जेणेकरून लोकांना पावसाळ्यात प्रवास करायला त्रास होणार नाही, अशी मागणी वाहनधारक करत आहेत.