रस्‍ता ओलांडणाऱ्या वृद्धास उडवले; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना नांदुरा शहरातील मुंबई ते नागपूर महामार्गावरील मोठ्या हनुमान मूर्तीजवळ आज, 27 एप्रिलला सकाळी 10.35 वाजता घडली. फकिरा वक्ते (65, रा. वडाळी, ता. नांदुरा) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच ओमसाई …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वयोवृद्ध व्‍यक्‍ती गंभीर जखमी झाला. ही घटना नांदुरा शहरातील मुंबई ते नागपूर महामार्गावरील मोठ्या हनुमान मूर्तीजवळ आज, 27 एप्रिलला सकाळी 10.35 वाजता घडली.

फकिरा वक्ते (65, रा. वडाळी, ता. नांदुरा) असे गंभीर जखमी झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाऊंडेशनचे विलास निबोळकार यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन वक्‍ते यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी खामगावच्‍या सामान्य रुग्णालयात वक्‍ते यांना हलविण्यात आले.