रस्‍ता रोखणाऱ्या ‘वंचित’च्‍या आंदोलनकर्त्यांना बुलडाण्यात अटक; लॉकडाऊनला विरोध सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीने शहरात रास्ता रोको आंदोलन केले. कोरोना महामारीपेक्षा लोक उपासमारीने मरतील. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा लॉकडाऊनचा विरोध करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीने शहरात रास्ता रोको आंदोलन केले. कोरोना महामारीपेक्षा लोक उपासमारीने मरतील. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा लॉकडाऊनचा विरोध करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते.  बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या पथकासह दंगाकाबू पथकही तैनात करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक बाळा राऊत, विक्रांत जाधव, बाळासाहेब वानखेडे, रमेशसिंह राजपूत, अर्जुन खरात, गाडेकर, दिलीप राजभोज, मिलिंद वानखेडे आदींनी  आंदोलनात सहभाग घेतला. शहर पोलिसांनी सहभागी सर्वांना अटक केली.