राजकारण्यांनो सावधान! 6 दिवसांतच 15 हजारांवर नागरिक मतदानापासून होणार वंचित!! बुलडाणा तालुक्यात मतदार यादीरुपी भूकंप येण्याची चिन्हे

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना व खरीप हंगामामुळे राजकारण काहीसे थंडावले असले तरी निवडणूक विभागाच्या संभाव्य कारवाईमुळे हे राजकारण चांगलेच तापण्याची दाट शक्यता आहे! याचे कारण वारंवार पाठपुरावा करूनही काहीच हालचाल न करणाऱ्या तब्बल 15 हजार 812 मतदारांची नावे मतदार यादीतून अधिकृतरित्या चक्क वगळली जाणार आहेत. ही कठोर कारवाई टाळायची असेल …
 
राजकारण्यांनो सावधान! 6 दिवसांतच 15 हजारांवर नागरिक मतदानापासून होणार वंचित!! बुलडाणा तालुक्यात मतदार यादीरुपी भूकंप येण्याची चिन्हे

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना व खरीप हंगामामुळे राजकारण काहीसे थंडावले असले तरी निवडणूक विभागाच्या संभाव्य कारवाईमुळे हे राजकारण चांगलेच तापण्याची दाट शक्यता आहे! याचे कारण वारंवार पाठपुरावा करूनही काहीच हालचाल न करणाऱ्या तब्बल 15 हजार 812 मतदारांची नावे मतदार यादीतून अधिकृतरित्या चक्क वगळली जाणार आहेत. ही कठोर कारवाई टाळायची असेल तर त्या नागरिकांनी किंवा आपले राजकारण सांभाळायचे असेल तर ‘त्यांच्या’ हाती केवळ 6 च दिवस हाय.

होय हे सत्य आहे, तसंही सत्य कडूच राहते अन्‌ हे सत्य तर कठोर आहेच; पण खळबळ माजविणारेही आहे. आताही ‘ ते’ 15 हजारावर नागरिक जागी झाले नाही अन्‌ राजकारणी, राजकीय पक्ष यांनी तात्काळ प्रयत्न केले नाही तर पुढील निवडणुका पण यामुळे प्रभावित होणार आहेत. बुलडाणा तालुक्यातील मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया निरंतर राहते. या प्रक्रियेदरम्यान हे 15 हजारांवर नागरिक दर्शवलेल्या मूळ निवास पत्त्यावर राहत नसल्याचे बूथ लेव्हल ऑफिसर यांना आढळून आलेत. मतदार यादीत त्यांचे फोटोच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ही नावे वगळण्याची शिफारस त्यांनी निवडणूक विभागाकडे केली, मागील 3 महिन्यांपासून सतत पाठपुरावा करूनही मतदानाचा हक्क धोक्यात आलेल्या या मतदारांनी बीएलओ किंवा तहसिल कार्यालयाशी संपर्क साधला नाही.

वगळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
दरम्यान यामुळे निवडणूक विभागाने ही नावे मतदार यादीतून वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र तरीही निवडणूक विभागाने या मतदारांना एक लास्ट चान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारांनी आपल्या अलीकडच्या रंगीत फोटोसह बीएलओ वा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावयाचा आहे. एसडीओ राजेश्वर हांडे व तहसीलदार रुपेश खंडारे यांनी हा अंतिम पर्याय उपलब्ध करून दिला आहे.