राजूर घाटात ट्रकचालकास लुटले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लिफ्ट दिल्यानंतर ट्रकचालकाला दोघांनी लुटल्याची घटना राजूरघाटात (ता. बुलडाणा) 10 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी दोघा लुटारूंविरुद्ध काल, 11 जूनला गुन्हा दाखल केला. इब्राहीम असीफ शेख (29, आयजीपुरा, सनदनगर फत्तेनगर हैदराबाद) याच्या ट्रकचे ब्रेक राजूर घाटात फेल झाले. त्यामुळे त्याने ट्रक बाजूला लावून लिफ्ट …
 
राजूर घाटात ट्रकचालकास लुटले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लिफ्ट दिल्यानंतर ट्रकचालकाला दोघांनी लुटल्याची घटना राजूरघाटात (ता. बुलडाणा) 10 जून रोजी रात्री साडेनऊच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी दोघा लुटारूंविरुद्ध काल, 11 जूनला गुन्‍हा दाखल केला.

इब्राहीम असीफ शेख (29, आयजीपुरा, सनदनगर फत्तेनगर हैदराबाद) याच्‍या ट्रकचे ब्रेक राजूर घाटात फेल झाले. त्‍यामुळे त्‍याने ट्रक बाजूला लावून लिफ्ट घेऊन बुलडाणा गाठले. सातबारा हॉटेलमधून जेवणाचा डब्‍बा घेऊन परत ट्रककडे येण्यासाठी त्‍याने दोघा दुचाकीस्वारांकडे लिफ्‍ट मागितली. दुचाकीस्वारांनी त्‍याला बसवून घेत राजूर घाटात हनुमान मंदिराजवळ सोडले. इब्राहीम ट्रककडे येत असताना मागून येत दुचाकीस्वारापैकी एकाने चाकूचा धाक दाखवून पैसे मागितले. त्‍यामुळे इब्राहीमने 2000 रुपये त्‍याला दिले. त्‍यानंतर त्‍याने मोबाइलही हिसकावून घेतला. त्‍यानंतर दोघे मोटारसायकलवरून पळून जात असताना इब्राहिमने धाडस करून त्‍यांच्‍या दिशेने धाव घेतली तेव्‍हा पैसे लुटणारा बुलडाण्याच्‍या दिशेने पळून गेला. दुसऱ्या लुटारूस इब्राहीमने पकडून ठेवले. MH28 AA8110 हा मोटासायकलचा क्रमांक असल्याचे इब्राहीमने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी दोघा लुटारूंविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, पळून गेलेल्या लुटारूचा शोध घेतला जात आहे.