राज्यात रक्ताचा तुटवडा; रक्तदानासाठी पुढे या

सरकारचे सामाजिक संघटना; नागरिकांना आवाहनमुंबई : सध्या कोविड-१९ मुळे विविध सार्वजनिक उपक्रम थांबले आहेत. राज्यात रक्तदान शिबिरासारखे उपक्रमही बंद झाले आहेत.परिणामी राज्यातील उपलब्ध रक्तसाठा संपत आला आहे. येत्या काही दिवसांत रक्तदान व रक्त संकलन अभियान न राबविले गेल्यास रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध सामाजिक संघटना व नागरिकाना रक्तदानासाठी …
 

सरकारचे सामाजिक संघटना; नागरिकांना आवाहन
मुंबई :
सध्या कोविड-१९ मुळे विविध सार्वजनिक उपक्रम थांबले आहेत. राज्यात रक्तदान शिबिरासारखे उपक्रमही बंद झाले आहेत.परिणामी राज्यातील उपलब्ध रक्तसाठा संपत आला आहे. येत्या काही दिवसांत रक्तदान व रक्त संकलन अभियान न राबविले गेल्यास रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध सामाजिक संघटना व नागरिकाना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा.
आजघडीला राज्यात केवळ ५-६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या कालावधीत रक्तसंकलन वाढीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागणार असल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारला सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीची चिंता सतावत आहे. कोरोनाचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसल्याने व त्यामुळे आरोग्य क्षेत्रात आणीबाणीसारखी स्थिती आहे.कोरोनामुळे रक्तदान शिबिरे, रक्त संकलनावर परिणाम झाला आहे. राज्यातील शेकडो रुग्णालयांत या स्थितीतही नियमित शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या शस्त्रक्रियानंतर रुग्णांना रक्ताची गरज भासते. जर रक्ताचा साठा वाढला नाही तर ते रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे तातडीने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन शासनाने केले आहे.