राज्‍याची बातमी : आश्चर्यम्‌… चक्क फेसाचा पाऊस; नागरिकांत पसरली घबराट!

चंद्रपूर : २१ सप्टेंबरच्या सायंकाळी चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. चंद्रपूरच्या दुर्गानगरात पडलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्याला कारणही तसेच होते. या भागात चक्क पावसासोबत “फेस’ पडत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. काशातून फेसाचा सडा सर्वत्र पडत होता. त्यामुळे काहींमध्ये कुतूहल तर काही नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण होते. यासंदर्भात पर्यावरण मित्रांनी चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रण …
 
राज्‍याची बातमी : आश्चर्यम्‌… चक्क फेसाचा पाऊस; नागरिकांत पसरली घबराट!

चंद्रपूर : २१ सप्टेंबरच्या सायंकाळी चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. चंद्रपूरच्या दुर्गानगरात पडलेल्या पावसामुळे मात्र नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्याला कारणही तसेच होते. या भागात चक्क पावसासोबत “फेस’ पडत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

काशातून फेसाचा सडा सर्वत्र पडत होता. त्यामुळे काहींमध्ये कुतूहल तर काही नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण होते. यासंदर्भात पर्यावरण मित्रांनी चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात चौकशी केली. मात्र मंडळाने आपली भूमिका अद्यापपर्यंत स्पष्ट केली नव्हती. चंद्रपूरमध्ये वीजनिर्मिती केंद्रातून वायू प्रदूषण होते. वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणारा धूर आणि केमिकल पावसाच्या संपर्कात आल्यामुळे असा “फेसा’चा पाऊस पडला असावा, असे तज्‍ज्ञांचे मत आहे.