राज ठाकरेंनीही मागितला अनिल देशमुखांचा राजीनामा

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनीही देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घ्यावा. ते स्वत: होऊन राजीनामा देणार नसतील तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. …
 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनीही देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा घ्यावा. ते स्वत: होऊन राजीनामा देणार नसतील तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देशमुख यांच्या राजीम्याची व याप्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. विरोधकांनी
याप्रकरणावरून ठाकरे सरकारला घेरण्याच्या दृष्टीने आक्रमक भूमिका घेतली असल्याने राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिले ते भाजपनेच त्यांना लिहून दिले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी करून याप्रकरणामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे.