रात्रीच्या संचारबंदीला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ!; आता रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यू ; मास्क न वापरणाऱ्यास पाचशे, थुंकणाऱ्यास 1 हजाराचा दंड, मिशन बिगीन अगेन अंतर्गत सवलतीही

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्हा प्रशासनाने आज, 31 मार्चच्या रात्री उशिरा लॉकडाऊनमधील पूर्वीचे निर्बंध कायम ठेवतानाच रात्रीची संचारबंदी आता रात्री 8 ते सकाळी 7 अशी केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही सवलती देखील दिल्या आहेत. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज रात्री उशिरा यासंदर्भातील 6 पानी सविस्तर आदेश जारी केला. आजपासून ते …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जिल्हा प्रशासनाने आज, 31 मार्चच्‍या रात्री उशिरा लॉकडाऊनमधील पूर्वीचे निर्बंध कायम ठेवतानाच रात्रीची संचारबंदी आता रात्री 8 ते सकाळी 7 अशी केली आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही सवलती देखील दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज रात्री उशिरा यासंदर्भातील 6 पानी सविस्तर आदेश जारी केला. आजपासून ते 15 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. मॉल्स, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, हॉटेल्स, उपहारगृहे सकाळी 8 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असून, हॉटेल्स, कँटीन, स्वीटमार्ट यांना मात्र रात्री 10 वाजेपर्यंत पार्सल सुविधाच देता येईल. मैदानात कसरती व मॉर्निंग वॉक करण्यास मुभा असून डेअरी सकाळी 6 ते रात्री 9.30 अशी सरसकट सुरू राहणार आहे.

महादंड

दरम्यान सार्वजनिक स्थळी मास्क न घालणाऱ्यास 500 तर थुंकणाऱ्यास 1 हजार दंड ठोठावण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्था कारवाई करतील. रॅली, आंदोलनास मनाई असून परवानगीने 5 व्यक्तींना निवेदन देता येईल. आठवडी बाजार बंद राहणार आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यास 500 रुपये दंडाचा तडाखा बसणार आहे.